कलर्स मराठीवर लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर यासारखे कलाकार पहायला मिळणार आहे. या मालिकेत एका बॉसची आणि तिच्या असिस्टटची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेची प्रचंड चर्चा आहे.
मराठी दूरदर्शनवर आता एका वेगळ्या आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात होत आहे. कलर्स मराठी वाहिनीवर 'बाईण जिंदाबाद' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्त्रीच्या भावविश्वातील असंख्य छटा या मालिकेतून उलगडताना दिसणार आहेत.
प्रत्येक भागात एका वेगळ्या स्त्रीची कथा, तिचा संघर्ष, तिचं धैर्य आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रयत्न पाहायला मिळणार आहे. 'बाईपण जिंदाबाद' या मालिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींचा समावेश आहे. सुकन्या मोने, शुभांगी गोखले, सुचित्रा बांदेकर, क्रांती रेडकर, शलाका पवार, दीपा परब, ऊर्मिला कोठारे आणि प्रार्थना बेहेरे या सर्व कलाकार स्त्रीत्वाच्या विविध रूपांना पडद्यावर आकार देणार आहेत. मालिकेचा पहिला भाग 'असिस्टंट माझी लाडकी' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
View this post on InstagramA post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
ही कथा आहे माधवी (सुकन्या मोने) या स्वप्नाळू स्त्रीची, जी एका वर्कहोलिक बॉसखाली (प्रार्थना बेहेरे) असिस्टंट म्हणून काम करते. ही कथा स्त्रियांमधील परस्पर सन्मान, मैत्री आणि परिपक्वतेचा सुंदर संदेश देणारी आहे. २६ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री आठ वाजता 'बाईपण जिंदाबाद' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टीआरपीसाठी कलर्स मराठीची नवी शक्कल; भेटीला येतोय नवीन कार्यक्रम, दिसणार एकापेक्षा एक भारी अभिनेत्री, नाव वाचलंत का?