जालना : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा ‘एसटी’ प्रवर्गाच्या आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी शहरातील अंबड चौफुली परिसरात गेल्या पाच दिवसांपासून विजय चव्हाण यांचे उपोषण सुरू आहे.
बंजारा समाजबांधवांनी मंगळवारी (ता. २१) उपोषणस्थळी दिवाळी साजरी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मेरा’ (वडिलधाऱ्यांकडून अत्यावश्यक वस्तूंची मागणी करण्याची पद्धत) मागितला.
उपोषणस्थळी समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत रिंग नृत्य केले. त्यानंतर तेथे चूल मांडून स्वयंपाक केला.
Banjara Protest: बंजारा समाजाचा महाएल्गार; ‘एसटी’ प्रवर्गामधून आरक्षण घेणारच, महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभागसमाजातील तरुणींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने ‘मेरा’ मागताना एसटी आरक्षणाची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीनिमित्त दिवे लालून अनोखे आंदोलन केले.