तुळजापूर : दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर सोमवारी (ता. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. प्रेम विनायक कांबळे (वय २२), नागेश दत्ता वाघमारे (१८) अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्रेम कांबळे, नागनाथ ऊर्फ नागेश वाघमारे तसेच सिद्धार्थ विनायक कांबळे (२०) हे खरेदीनिमित्त तुळजापूरला आले होते.
गावी, तीर्थ बुद्रुक (ता. तुळजापूर) येथे दुचाकीने परतत असताना दोन दुचाकींच्या धडकेत प्रेम कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी नागनाथ वाघमारे यास धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयातून सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्याचा सोलापूर येथे मृत्यू झाला.
Tractor Accident: ट्रक-ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; मध्यप्रदेशच्या हिवरा शिवारातील घटनाजखमी सिद्धार्थ कांबळे याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे तीर्थ बुद्रुक गावावर शोककळा पसरली.