सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अॅक्शन प्लॅन
esakal October 23, 2025 05:45 PM

प्रा. राजेश जाधव

दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊन विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. कुणी अभियांत्रिकी, कुणी फार्मसी, कुणी आर्किटेक्चर, कुणी डिझाईन, तर कुणी मॅनेजमेंटमध्ये जातात. पहिलं वर्ष हे करिअरचा मजबूत पाया ठरू शकतो.

योग्य मानसिकतेसह प्रवेश घ्या

शालेय जीवन संपलं. आता कॉलेजमध्ये चमच्याने शिकवणं नाही; शिक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल. शिक्षक मार्गदर्शन करतील, सीनियर्स मदत करतील, परंतु करिअर तुम्हालाच पुढे न्यायचं आहे. प्रवेशपत्र ही यशाची हमी नाही, ती फक्त शर्यतीची प्रवेशिका आहे.

शैक्षणिक पाया मजबूत करा

पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम साधा वाटतो. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्युनिकेशन किंवा प्रोग्रॅमिंग. परंतु हेच पुढील पायऱ्यांचे खांब आहेत.

  • नियमित पुनरावलोकन करा, फक्त परीक्षेवेळी नाही.

  • फक्त गुणांसाठी नाही, तर संकल्पना समजून घ्या.

  • मित्रांमध्ये छोटे गट तयार करा, एकमेकांना शिकवा.

तांत्रिक कौशल्ये लवकर सुरू करा

  • पदवीबरोबरच कौशल्यांनाही महत्त्व.

  • अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअरवर काम करावे.

  • फार्मसी विद्यार्थी प्रयोगशाळा तंत्रज्ञान व विश्लेषण साधनांमध्ये पारंगत व्हावेत.

संवादकौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स

  • तांत्रिक कौशल्ये इंजिन असतील तर संवादकौशल्ये स्टेअरिंग आहेत.

  • इंग्रजी वाचन, लेखन, बोलणे यामध्ये सुधारणा करा.

  • नाट्य, पब्लिक स्पीकिंग क्लबमध्ये सहभागी व्हा.

Pune Crime News : उंड्री- पिसोळी रस्त्यावर दारू दुकानात चोरी; दीड लाखाची रोकड लंपास

तंत्रज्ञानाचा उपयोग साधन म्हणून करा

  • स्मार्टफोन आणि इंटरनेट हे खेळणे नसून ग्रंथालय बनवा.

  • डिजिटल टाइमटेबल तयार करा

  • यश फक्त ज्ञानावर नाही, तर मार्गदर्शनावरही अवलंबून असतं.

  • अल्युमनीशी संपर्क ठेवा - ते उद्योगाबद्दल खरे अनुभव सांगतील.

व्यक्तिमत्त्व विकास

  • फक्त अभ्यासातच नाही, तर सर्वांगीण प्रगती आवश्यक

  • सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, विद्यार्थी संघटनांमध्ये सहभागी व्हा.

  • वेळेचं नियोजन शिका.

  • शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळा.

प्लेसमेंटची तयारी पहिल्या दिवसापासून

  • पहिल्या वर्षापासून सीव्ही डायरी ठेवा - प्रोजेक्ट्स, वर्कशॉप्स, प्रमाणपत्र लिहून ठेवा.

  • रोज १५ मिनिटे अॅप्टिट्यूड व लॉजिकल रिझनिंग सराव

  • सुट्टीत इंटर्नशिप करा.

  • शिकणं पुढे ढकलू नका.

  • आंधळेपणाने मित्रांचा पाठलाग करू नका.

  • पहिल्या वर्षाला कमी लेखू नका. हेच करिअरच्या झाडाची मुळे आहेत.

स्मार्ट अॅक्शन प्लॅन एकाच दृष्टिक्षेपात

  • पहिलं-दुसरं वर्ष ः पाया, तांत्रिक कौशल्ये, संवाद.

  • तिसरं वर्ष ः मिनी-प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, प्रमाणपत्र.

  • चौथं वर्ष ः प्लेसमेंट तयारी, मुलाखती, अंतिम प्रोजेक्ट्स.

  • निष्कर्ष ः कृतीत उतरवा

विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक शिक्षण ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. पहिलं वर्ष ही वॉर्म-अप आहे. आता तयारी केलीत तर पुढची वर्षं आनंददायी होतील आणि प्लेसमेंट सहज मिळेल.

यशस्वी विद्यार्थ्याला सरासरी विद्यार्थ्यापेक्षा वेगळं ठरवणारं म्हणजे आयक्यू नाही, तर शिस्त, नियोजन आणि कृती आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवसापासून स्मार्ट कृती करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.