नवी दिल्ली : ‘‘सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलणारे नक्षलवादी आता शरणागती पत्करत आहेत आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, असे सांगतानाच नक्षलवाद लवकरच इतिहासजमा होईल.
’’ असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पोलीस स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चाणक्यपुरी येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात सिंह यांनी हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो.
मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा नायनाट करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे, असे सांगत सिंह म्हणाले की, नक्षलवाद ही अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. एककाळ असा होता की जेव्हा छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणामधील असंख्य जिल्हे नक्षलवादाने ग्रस्त होते. गावांमधील शाळा त्यावेळी बंद असत.
रस्ते नव्हते आणि लोक भीतीच्या छायेखाली राहत असत. नक्षलवादाच्या समस्येला यापुढे ठेवायचे नाही, असा आमचा निर्धार आहे. त्याच्या नायनाटासाठी ज्या प्रकारे पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनांची एकत्र येऊन काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. जे भाग कधी नक्षलवादाचे बालेकिल्ले समजते जात असत, ते आता शिक्षणाचे किल्ले बनत आहेत.
देशातील लाल भाग म्हणून दर्शवले जाणारे भाग आता विकासाचे भाग बनत आहेत. हे बदल घडवून आणण्यासाठी सरकार सक्षम आहे आणि यामध्ये सुरक्षा दलांचे योगदान महत्त्वाचे आाहे. पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी पोलीस दलांना संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यांच्यासाठीच्या अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली. सध्याच्या काळात पोलिसांना गुन्ह्यांविरोधातच लढायचे आहे असे नाही तर चुकीच्या समजाविरोधातही लढा द्यायचा आहे, असे सिंह म्हणाले. १९५९ मध्ये याच दिवशी हॉट स्प्रिंग भागात चिनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.
PM Modi : लष्कराची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे, पंतप्रधानांना विश्वास; नौसैनिकांसोबत साजरी केली दिवाळीसैनिकांनी सापळा रचून दहा सैनिकांची हत्या केली होती, असे सांगत संरक्षण मंत्री म्हणाले की, पोलीस आणि सुरक्षा दल हे देशाच्या सुरक्षेचे स्तंभ आहेत.लष्कर आणि पोलीस हे मंच केवळ वेगळे आहेत. पण देशाची सुरक्षा हेच त्यांचे लक्ष्य आहे.