Leopard Attack: जांबुत येथे पहाटे बिबट्यांच्या हल्यात महिलेचा मृत्यु
esakal October 23, 2025 11:45 PM

जांबुत ( थोरातवस्ती ) : या परिसरात हि दुर्देवी घटना घडली असुन जाधव यांचे शेतात घर आहे घराच्या बाहेर शौचालय आहे . भागुबाई या पहाटे सहा वाजता शौचालयास उठल्या नंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यांने हल्ला केला.

मात्र अचानक हल्ला झाल्यांने आवाजही करता आला नाही , सुमारे पंधरा मिनिटांनी त्यांच्या घरातील मुले उठल्यानंतर बाहेर पडलेल्या चपला वरून शोधाशोध सुरू केली . बिबटयांने भागुबाईना ओढत नेले त्या दिशेने नातेवाईक गेले त्या वेळी अर्धा किमी दुर ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला असत्यांचे त्यांचा मुलगा विठ्ठल व गोविद जाधव यांनी सांगितले.

घरांच्या परिसरात मोकळी शेतजमीन असून . बिबट्यांने अर्धा कि .मी पर्यन्त भागुबाईना ऊसाच्या शेतात घेऊन गेला . या घटनेमुळे ऐन दिपावळीत नागरीकामधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard Attack Kolhapur : पन्हाळ्याच्या पायथ्याशी बिथरलेल्या बिबट्याचा धुडगूस, ६ जणांवर हल्ला; वनविभागाला दिला चकवा

लक्ष्मीपुजन करून आनंदात झोपलेल्या भागुबाईवर बिबट्यांने हल्ला केल्यांने जाधव परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे . आठवडाभरातचं हि दुसरी घटना घडली आहे .घटना स्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्यासह वनकर्मचारी पोहचले आहेत .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.