Why Sarfaraz Khan was not selected in India A squad : मुंबईचा फलंदाज सर्फराज खान याला पुन्हा एकदा भारत अ संघात स्थान मिळालेले नाही. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत अ संघ जाहीर करण्यात आला. या संघात सर्फराज, मोहम्मद शमी, इशान किशन या खेळाडूंना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशात सर्फराजला संघात स्थान न मिळण्यामागे रिषभ पंत ( Rishabh Pant) हे कारण असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सर्फराजने जवळपास १७ किलो वजन कमी केले. इंग्लंड दौऱ्यावर भारत अ संघाकडून त्याने सराव सामन्यात ९२ धावांची खेळीही केली. पण, त्याची निवड झाली नाही. त्यानंतर त्याला बुची बाबू स्पर्धेत दुखापत झाली आणि त्याला दुलीप करंडक स्पर्धेला मुकावे लागले. पण, तो आता रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळतोय आणि पहिल्या सामन्यात त्याने ४२ व ३२ धावांची उपयुक्त खेळी केली होती.
Rishabh Pant कडे भारतीय संघाचे नेतृत्व! १८ वर्षीय आयुष म्हात्रेची निवड; जाणून घ्या कधी व केव्हा होणार हायव्होल्टेज मालिका सर्फराजला वगळण्यामागे रिषभ पंत?PTI ने दिलेल्या वृत्तानुसार रिषभ पंतमुळे सर्फराजला भारत असंघात स्थान मिळवता आले नाही. रिषभकडे या संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे आणि तो दोन्ही सामन्यांत खेळणार हे निश्चित आले. सर्फराज हाही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्यामुळेच त्याची निवड झालेली नाही. निवड समितीने पाचव्या क्रमांकासाठी रिषभला प्राधान्य देण्याचे ठऱवले. मुंबईचा फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय. सर्फराज मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा भारताकडून खेळला होता. त्या मालिकेत त्याने ०, १५०, ११, ९, ० व १ असा सहा डावांत खेळ केला होात. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला बाहेर बसवले गेले.
सर्फराज तिसऱ्या क्रमांकावर खेळणार?भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सर्फराजला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला गेला आहे. भारताचे माजी निवड समिती सदस्यांनी PTI ला सांगितले की, सर्फराजने मुंबई संघाच्या व्यवस्थापनाशी याबद्दल बोलायला हवं आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं. भारतीय संघात ५ व ६ क्रमांकावर खेळण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यामुळे सर्फराजला भारतीय संघात संधी मिळणे अवघड आहे. जर तो मुंबईकडूनही पाचव्या क्रमांकावर खेळत राहिला, तर त्याला संधी मिळणार नाही.
Mohammed Shami चा काढला काटा! सातत्याने धावा करणाऱ्या 'मुंबई'च्या खेळाडूकडे आगरकरचं दुर्लक्ष; पुनरागमन झालं अशक्यसर्फराजने मुंबई संघ व्यवस्थापनाशी आणि सीनियर खेळाडू अजिंक्य रहाणे याच्याशी चर्चा करायला हवी. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नव्या चेंडूचा सामना करायला हवा. भारताकडे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर बरेच अष्टपैलू पर्याय आहेत. रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा व नितीश रेड्डी... जर हे सर्व फिट असतील तर ते संघात दिसणारच. पंतला दुखापत झाल्यास ध्रुव जुरेल आहेच, असेही माजी निवड समिती सदस्याने सांगितले.