16 Guruvar Vrat: फक्त १६ गुरुवार व्रत ठेवा आणि बदलून टाका आयुष्य; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
esakal October 23, 2025 07:45 PM

Thursday Vrat: हिंदू धर्मानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित असतो. गुरुवारचा दिवस भगवान बृहस्पति (गुरु) यांना समर्पित आहे. ते सर्व देवतांचे गुरु मानले जातात आणि सर्वात मोठे व शक्तिशाली ग्रह आहेत.

ज्योतिषशास्त्रात बृहस्पति हे ज्ञान, प्रकाश आणि धर्म यांचे प्रतीक मानले गेले आहे. गुरुवारचा व्रत केल्याने आयुष्यात सुख समृद्धी यश आणि वैवाहिक जीवनात सौभाग्य वाढते. भगवान बृहस्पति यांना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते, म्हणून हा व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.

Ram Sita Vanvas Place: इथे राम अन् सीतेने केला होता १४ वर्षे वनवास, आजही पवित्र मानली जाते ठिकाण, तिथे पोहोचायचे कसे? जाणून घ्या १६ गुरुवार व्रताचे महत्त्व

शास्त्रांनुसार सतत १६ गुरुवार व्रत केल्याने भगवान बृहस्पती देव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या व्रतीत संयम, भक्ती आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. १६ गुरुवारांच्या अखेरीस भक्ताला त्याच्या मनोकामना पूर्ण होण्याचा योग मिळतो.

१६ गुरुवार व्रताची पूजा विधी सकाळी स्वच्छ राहा

व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, विशेषतः पिवळ रंगाचे कपडे शुभ मानले जातात.

पूजा स्थळ तयार करा

पूजा करण्यासाठी घरात शांत आणि स्वच्छ जागा निवडा. तिथे भगवान बृहस्पतीची प्रतिमा किंवा चित्र ठेवा.

पूजा साहित्य

पिवळे फुलं, गूळ, हरभरा डाळ, केळी, बेसनाचे लाडू, तूप, दिवा आणि अगरबत्तीची व्यवस्था करा.

पूजा विधी

मूर्तीवर पवित्र जल शिंपडा आणि तूपाचा दीप लावा. “ॐ बृं बृहस्पतये नमः” आणि “ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः” या मंत्रांचा जाप करा.

प्रसाद अर्पण करा

केलेले लाडू, केळी वगैरे देवाला अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून वाटा.

दान करा

शक्य असल्यास गरीबांना पिवळ्या वस्तूंचे दान करावे, ज्यामुळे व्रताचे पुण्य अधिक वाढते.

Baby Care After Diwali: दिवाळीनंतर लहान बाळांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या काही खास सोप्या टिप्स! व्रत करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

- व्रताच्या दिवशी केस कापणे किंवा दाढी करणे टाळा.

- शक्य असल्यास उपवास करा किंवा हलकं अन्न ग्रहण करा.

- मन एकाग्र करा आणि भक्तीपूर्वक पूजा करा.

- व्रत सातत्याने पाळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल.

गुरुवार व्रताचे फायदे

- जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख-शांती वाढते.

- आर्थिक प्रगती होते आणि नोकरी-व्यवसायात यश मिळते.

- आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता लाभते.

- कुटुंबात सौख्य आणि प्रेम वाढते.

- बृहस्पती ग्रहाचा शुभ प्रभाव वाढतो, ज्यामुळे ग्रह दोष दूर होतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.