व्याजाच्या प्रलोभनातून लाखोंची फसवणूक
श्रीवर्धन (बातमीदार) ः देवळी गावातील एका व्यक्तीची साडेदहा लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. माणगाव तालुक्यातील देवळी रहिवाशांनी २५ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान फेसबुकवरील क्विक लोन सर्व्हिसच्या लिंकवर क्लिक केले होते. त्यानंतर आरोपींनी एक लिंक पाठवताना पाच लाखांचे कर्ज चार टक्के व्याजाने दिले. त्यांच्या पत्नींकडून तब्बल नऊ लाख पन्नास हजार, एक लाख रुपये ऑनलाइनच्या माध्यमातून उकळले. यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी आरोपी राज कुंडु, पंकज बदोरियाविरोधात गुन्हा दाखल आहे.