रात्रीच्या वेळी परफ्यूम किंवा अत्तर लावल्याने खरंच नकारात्मक शक्ती आकर्षित होतात? तुम्हालाही आलाय का हा अनुभव?
Tv9 Marathi October 24, 2025 04:45 PM

पार्टी असो,कोणताही कार्यक्रम असो किंवा अगदी रोज ऑफिसला वैगरे जाताना असो. अनेकजण परफ्यूम किंव अत्तर लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. अनेकांना सुगंध फार आवडतो. अनेकजणांकडे तर परफ्यूम आणि अत्तरांचे कलेक्शनही असते. पण सोबतच अनेकदा घरातील मोठ्यांकडून हे ऐकले असेल की बाहेर जाताना विशेषत: रात्रीच्यावेळी बाहेर जाताना स्ट्राँग सुंगध असलेला परफ्यूम किंवा अत्तर वापरू नये. कारण रात्रीच्या वेळी परफ्यूम किंवा अत्तर लावल्याने त्यातील सुगंधामुळे अनेक नकारात्मक शक्ती जवळ येतात. त्यामुळे रात्री परफ्यूम, किंवा अत्तर लावणे टाळण्या सल्ला दिला जातो.

परफ्यूम लावणे आणि रात्री बाहेर जाणे खरोखरच समस्या निर्माण करते का? याची धार्मिक कारणे कोणती आहेत आणि ते वैज्ञानिकदृष्ट्या किती योग्य आहे हे देखील जाणून घेऊयात.

परफ्यूम किंवा अत्तर नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात? 

शास्त्रांनुसार, रात्रीची वेळ ही नकारात्मक उर्जेसाठी अधिक संवेदनशील असते. तीव्र सुगंध आणि परफ्यूम नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येण्याचा धोका वाढतो. खरंतर सुगंधाद्वारे कोणीही आकर्षित होऊ शकते. सुगंधाद्वारे कोणत्याही प्रकारची शक्ती आकर्षित केली जाऊ शकते. हे सत्य आहे. आणि अनेक शास्त्रांमध्येही ते नमूद केलेले आहे.

आध्यात्मिक साधनेमधील अडथळे

सनातन धर्मात, आध्यात्मिक साधना करण्यासाठी रात्रीचा काळ महत्त्वाचा मानला जातो. या काळात मन शांत आणि विचार शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. अत्तर आणि सुगंधांचे तीव्र वास मन विचलित करू शकतात, ज्यामुळे आध्यात्मिक साधनेतही अडथळा निर्माण होऊ शकते. कारण सुगंध जेवढा चांगला तेवढाच तो मन विचलीत करणाराही असतो.

म्हणूनच पूजा करताना किंवा मंदिरांमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी सुगंधी नैवेद्य दाखवले जातात. म्हणूनच मंदिरांमध्ये फुले अर्पण केली जातात आणि धूप जाळला जातो. शिवाय, प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळ्या फुलांचा सुगंध वापरला जातो. जेणेकरून सकारात्मकता निर्माण होईल.

रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा जास्त असते

दिवसा सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते. तथापि, रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते. अशा परिस्थितीत, परफ्यूम किंवा सुगंध ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. जर असे झाले तर तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक समस्या येऊ शकतात. रात्रीच्या वेळी, विशेषतः निर्जन ठिकाणी, परफ्यूम न लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा ठिकाणी आधीच नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. तसेच पाण्याच्या ठिकाणी देखील नकारात्मक शक्तींचा वावर जास्त असतो. आणि अशा ठिकाणी परफ्यूम विशेषत: अत्तरामुळे या नकारात्म शक्ती जागृत होऊन नक्कीच आकर्षित होऊ शकते.

वैज्ञानिक कारण काय?

झोपताना जास्त स्ट्राँग परफ्यूम किंवा अत्तर वापरू नये अन्यथा त्याच्या सुगंधामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच काही लोकांमध्ये ऍलर्जी निर्माण करू शकतात. यामुळे शिंका येणे, नाक बंद होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला जर झोपताना सुगंध हवाच असेल तर त्यासाठी वेगळ्या अरोमा कँडल मिळतात त्या तुम्ही लावू शकता किंवा तुपाचा दिवा लावू शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.