बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी जास्त चर्चेत असते. ऐश्वर्या आता पन्नाशीत आहे तरी तिचे सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाही. तिची क्रेझ आजही लोकांमध्ये आहे. पण एक काळ असा होता की ऐश्वर्याच्या एका 4 सेकंदाच्या जाहिरातीने तिला रातोरात स्टार बनवले होते. तिला या जाहिरातीमध्ये एवढं पसंत केलं गेलं होतं की तिच्यासाठी 5000 फोन येऊन गेले होते. याचा खुलासा एका निर्मात्याने केला आहे.
ऐश्वर्या रायच्या अवघ्या चार सेकंदांच्या झलकाने संपूर्ण देशाला भुरळ घातली होती
प्रसिद्ध जाहिरात निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी हा किस्सा सांगितला. ही घटना 1993 च्या जाहिरातीबद्दल आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या रायच्या अवघ्या चार सेकंदांच्या झलकाने संपूर्ण देशाला भुरळ घातली होती. ही एक प्रसिद्ध पेप्सीची जाहिरात होती, जी आजही आठवते. या जाहिरातीत आमिर खानसोबत एक नवीन चेहरा होता तो म्हणजे ऐश्वर्या राय. त्यावेळी ऐश्वर्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. प्रल्हाद कक्कर यांनी सांगितलं की या जाहिरातीनंतर ऐश्वर्याबद्दल विचारणा करण्यासाठी त्यांना देशभरातून हजारो फोन येऊ लागले होते.
तिच्या खांद्यावर बॅग होती, फाटलेली जीन्स घातली होती
ते म्हणाले की,”मी कोणत्याही मुलींबद्दल समाधानी नव्हतो कारण जाहिरातीसाठी मला हवा तसा चेहरा कोणीही असाच प्रभाव पाडत नव्हता. मला एक वेगळा चेहरा हवा होता. मग काही मुलींनी मला ऐश्वर्याची ओळख करून दिली, तिच्या खांद्यावर बॅग होती, फाटलेली जीन्स घातली होती आणि तिचे केस खुले होते. ती आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकत होती.”
तिच्या डोळ्यांचा रंग तिच्या मूडनुसार बदलत असे
प्रल्हाद पुढे म्हणाले, “मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो‘ही ती आहे का?’ आम्ही मेकअप टेस्ट केली. पण मला हरवणारे डोळे तिचे होते. जेव्हा मी तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा असे वाटले की संपूर्ण विश्व त्यांच्यातच सामावले आहे. तिच्या डोळ्यांचा रंग तिच्या मूडनुसार बदलत असे—कधी राखाडी, कधी हिरवा, कधी निळा. हे सर्व पाहून मी थक्क झालो. जेव्हा आम्ही तिला तयार केले तेव्हा ती जादुई दिसत होती.”
View this post on Instagram
A post shared by Pooja Rathi (@poojaslibrary)
ज्यामध्ये तिने तिच्या स्टाईलने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली होती.
ऐश्वर्याच्या या काही सेकंदाची जाहिरात होती. ज्यामध्ये तिने तिच्या स्टाईलने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली होती. या व्हिडिओमध्ये तिने अवघ्या तीन सेकंदात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऐश्वर्या रायची ही जाहिरात पहिल्यांदा पडद्यावर येऊन 19 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या जाहिरातीमुळे ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच चर्चेत आली होती. या जाहिरातीनंतर मिळालेल्या यशामुळे ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर, 1994 मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. दरम्यान आजही त्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. आणि आजही लोक त्याच उत्सुकतेने ही जाहिरात पाहतात.