बीबी : बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर खळेगाव नजीक नागपूर मुंबई लेनवर संशयास्पदरित्या थांबलेल्या कंटेनर चालकाजवळ एक पिस्टलसह चार जिवंत काळतूस आढळून आले. तपासांती पोलिसांनी चालकास अटक करून न्यायालयीन कोठडीत डांबले आहे.
याबाबत सविस्तर असे की, लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या समृद्धी महामार्गावर खळेगाव नजीक नागपूर मुंबई लेनवर 19 ऑक्टोबर रोजी दुपारचे सुमारास बीबी पोलीस स्टेशनचे अधिकारी व वाहतूक शाखा बुलडाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. यादरम्यान वाहन क्रमांक एम एच 40 सीडी 0735 आयशर संशयास्पद रित्या थांबला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यावेळी पोलिसांनी वाहन चालकाची विचारपूस केली .त्याच्या हालचाली आणखीनच संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव आदिल उर्फ मोहम्मद मेराज मोहम्मद मुस्तकीम रा. सोभीपुर, तालुका जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश असल्याचे सांगितले .
Crime: सासरेबुआ, तुमच्या मुलीचे तीन प्रियकर, तिला समजावून सांगा! जावयाची विनंती; पण सासऱ्यानं उलट उत्तर दिलं अन्...; नको ते घडलंपोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची अंग झडती घेतली असता, त्याचे खिशात दोन व पिशवीत दोन जिवंत काडतुसासह एक सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्टल मिळाले. पोलीस पथकाने त्याचे जवळील मोबाईल, आयशर व रोख रक्कम 4200 असा एकूण 10 लाख 24 हजार दोनशे रुपये नगदी व आयशर मधील संशयास्पद माल व देशी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्यावर बीबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक केलेला सराईचा गुन्हेगारआरोपीस तत्काळ अटक करून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे विरोधात उत्तर प्रदेश राज्यात दरोडा, जबरी चोरी ,फसवणूक, लुटपाट ,गँगस्टर ,विस्फोटक पदार्थ बाळगणे, अवैद्य शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत .तो उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मानधाता पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर, सराईत गुन्हेगार असल्याचे समजते .तो आपली ओळख लपवून नागपूर येथील सीसीआय ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करतो. घटनेवेळी तो आयशर मधून पुणे येथे डी मार्ट चा माल घेऊन जात होता. हत्यारासह महाराष्ट्रात मिळून आल्याने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.