Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना
Saam TV October 24, 2025 06:45 PM

पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ प्रशिक्षणार्थी पोलिसाचा गुदमरून मृत्यू

पेस्ट कंट्रोल केलेल्या बंद रूममध्ये गुदमरून मृत्यू

मृताचे नाव रवींद्र बबन जाधव असून त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला

पोलिस तपास सुरू आहे

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घडना घडली आहे. पेस्ट कंट्रोल केलेल्या रूम मध्ये जीव गुदमरल्यामुळे पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना ही पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ घडली आहे. मृत प्रशिक्षणार्थी पोलिसाचे नाव रवींद्र बबन जाधव असे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ असलेल्या सुतराम स्मृती बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती घरात बेशुद्ध पडला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.

Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

या खोलीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी राहत असून दिवाळी निमित्त ते गावी गेले होते. यावेळी येथील एका विद्यार्थ्याने सांगितलं की जाधव हे खोलीत राहत असून ते फोन उचलत नाहीत. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून पाहिले असता जाधव बेशुद्ध असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आत जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी झुरळ मारण्याचे औषध ठिकठिकाणी ठेवल्याचे आढळून आले.

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

या खोलीत पूर्णपणे पेस्टिसाइड केलेली असून सर्व दारे, खिडक्या बंद केल्याचं दिसून आलं. परिणामी जाधव यांचा जीव गुदमरला असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून जाधव यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.