मालेगांव : दिवाळीचा दुसरा दिवस, पाडवा आमखेड्यासाठी रक्तरंजित दिवस निघाला असून तालुक्यातील जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमखेडा या गावात घरगुती नातेसंबंधांवरून झालेल्या आपसी वादातून चाकूहल्ला करण्यात आला.
त्या हल्ल्यात अविनाश निमिचंद चव्हाण (हम) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अन्य चार जण गंभीर जखमी झालेत. ही घटना बुधवारी (ता. २२ ऑक्टो.) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आमखेडा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आमखेडा गांवातील पारधी समाजामध्ये व इतर गावातील नातेसंबंधातील पारधी समाजामध्ये बऱ्याच दिवसांपासून आपसी वाद सुरू होता.
त्यातूनच राजू रामचंद्र पवार (गिव्हा), पवन गजानन चव्हाण, अजय गजानन चव्हाण (बोराळा), दादाराव गंभीर पवार, अशोक रामचंद्र पवार (वाघी), सुधाकर रामचंद्र पवार (आमखेडा), इंडियन सारा चव्हाण, सीताराम पिंटू चव्हाण व पिंटू चव्हाण (नावजी जांभरूण) यांनी एकत्र येत आमखेडा येथील अविनाश निमिचंद चव्हाण, संदेश निमिचंद चव्हाण, गजानन निमिचंद चव्हाण, स्वाती शिवा चव्हाण व आकाश दर्याभान चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्रांनी व चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये अविनाश चव्हाण यांच्या मानेवर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, संदेश चव्हाण, स्वाती चव्हाण, गजानन चव्हाण, आकाश चव्हाण हे चार जण गंभीर जखमी झालेत.
Selu Crime : वालूरमध्ये दरोड्याची साखळी; नातवाचा खून, आजी जखमी तर वृद्ध दाम्पत्यावरही खुनी हल्ला करून दागिने लंपासत्यांना गंभीर अवस्थेत वाशीम येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हे आमखेडा येथे दुचाकीवरून आले होते. त्यांनी आमखेडा येथे पोहचताच आपल्या दुचाकींच्या नंबरप्लेट काढून टाकल्या आणि हल्ल्यानंतर दोन ते तीन दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाल्याचे समजते. या घटनेमुळे आमखेडा व परिसरातील गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनेचा पुढील तपास जऊळका पोलिस करत आहेत.