टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिय विरूद्धच्या पहिल्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. रोहित पर्थमध्ये 8 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. रोहितने एडलेडमध्ये 73 धावांची खेळी केली. त्यानंतर रोहितने या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कमाल केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 237 धावांचा पाठलाग करताना खणखणीत शतक झळकावलं आहे. रोहितच्या कारकीर्दीतील हे 33 वं शतक ठरलं आहे. रोहितने या शतकासह टीम इंडियाला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं आहे. रोहितने अवघ्या 63 चेंडूत एकदिवसीय कारकीर्दीतील 60 वं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहितने गिअर बदलला. रोहितने फटकेबाजी करत 105 चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहितने शतक पूर्ण करताच साऱ्या मैदानात क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.
रोहितने शतकासाठी 105 चेंडूंचा सामना केला. रोहितने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने 95.24 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं एकदिवसीय कारकीर्दीतील नववं शतक ठरलं. विशेष म्हणजे रोहितने यासह शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच एकदिवसीय, कसोटी आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमधील मिळून हे 50 वं शतक ठरलं.