आपण मदत म्हणून अनेकांना कधीना कधी पैसे दिलेले असतात. पण अनेकदा प्रयत्न करूनही ते दिलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा समोरची व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करते किंवा न देण्याची कारणे शोधतात. अशावेळी वास्तुशास्त्रातील एक उपाय नक्कीच यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या उपायासाठी लागणारी वस्तू ही प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असते. खरंतर ही वस्तू म्हणजे एक मसाला आहे, जो फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर धन आकर्षित करण्यासाठीही उपयुक्त ठरतो.
दरम्यान हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्र असे अनेक उपाय सांगतात जे घरात आनंद, शांती आणि संपत्तीची ऊर्जा वाढवतात. या मसाल्याचा असाच उपयोग फार लाभदायी ठरतो. त्याचा योग्य वापर केल्याने केवळ संपत्ती वाढतेच नाही तर अडकलेल्या आर्थिक समस्यांवर उपाय देखील मिळतो. म्हणजे जर तुमचे उधार घेतलेले पैसे किंवा तुमचे कोणाकडे रीहिलेले पैसे येण्याचा मार्गही मोकळी होता. तसेच या उपायाने तुमच्या घरात पैशांचा प्रवाह राहतो. तर, स्वयंपाक घरातील हा मसाला म्हणजे धणे. होय, धणे हे पैसे आकर्षित करण्यासाठी फार महत्त्वाचे मानले जातात. त्याचे काय उपाय आहेत जाणून घेऊयात.
धन आकर्षणासाठी खास उपाय
धणे बियाणे अंकुरणे ही सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी पद्धत मानली जाते. असे म्हटले जाते की बियाणे हिरवेगार आणि दाट कोंब तयार करतात तेव्हा ते घरात आर्थिक समृद्धी आणतात.
बाजारातून अख्खे धणे खरेदी करा, ते घरी आणा आणि एका कुंडीत पेरा. मातीला हलके पाणी द्या आणि ती घराच्या उत्तर दिशेला ठेवा, कारण उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते.
जेव्हा धणे अंकुरतात आणि हिरवेगार रोप येते तेव्हा ते आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण असते. जर रोप कमकुवत किंवा पिवळे दिसत असेल तर ते तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देण्याची चेतावणी मानली जाते.
हा उपाय नियमितपणे केल्याने केवळ पैशाची आवक वाढत नाही तर घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाहही मजबूत होतो.
अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी धणे उपाय:
संध्याकाळी, एक स्वच्छ कागद घ्या. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवायचे आहेत त्याचे नाव लिहा. कागदावर काही संपूर्ण धणे ठेवा आणि त्याची एका लहान पुरचुंडी करा. नंतर त्याच्याजवळ आपली इच्छा बोलून नदी किंवा कालव्यासारख्या वाहत्या पाण्यात सोडून द्या.
असे मानले जाते की हा उपाय केल्याने पैसे परतफेडीचा मार्ग मोकळा होतो आणि अडकलेले पैसे हळूहळू तुमच्याकडे परत येतात. हा उपाय आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि पैशाचा प्रवाह सुरळीत राखण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
तिजोरीत धणे ठेवल्याने काय होते?
तुमच्या घरात स्थिर संपत्ती राखणे हे ते आकर्षित करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या तिजोरीत धणे ठेवल्याने समृद्धी तसेच आर्थिक प्रगती येते.
उपाय कसा करावा?
लाल कापडात थोडे धणे, चांदीचे नाणे आणि थोडी हळद एकत्र करा. लक्ष्मी देवीचे नाव घेऊन ते एका त्याची एक पुरचुंडी करा. नंतर ती पुरचुंडी तिजोरीत, कपाटात किंवा पैसे किंवा दागिने ठेवलेल्या कोणत्याही ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की ही पुरचुंडी संपत्ती आकर्षित करते आणि तिजोरी दीर्घकाळ भरलेली ठेवते.