महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं.
त्यांनी पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा गंभीर आरोप केला.
आतेभावाने माध्यमांसमोर मोठा खुलासा केला.
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं. याप्रकरणी त्यांनी २ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, कुटुंबियांनी पोलीस आणि रूग्णालयातील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरच्या आतेभावाने राजकीय दबाव टाकला असल्याचं सांगितलं.
डॉक्टरच्या आतेभावाने साम टिव्हीच्या प्रतिनिधीसमोर धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणामुळे आत्महत्या प्रकरणातील अनेक गूढ समोर येत आहे. 'मागील वर्षभरापासून तिच्यावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता. चुकीचे आणि खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तिची बहीण मेडिकल ऑफिसर आहे. संपदा मुंडे घरी सगळं सांगत नव्हती. पण ती आपल्या बहिणीला सगळं सांगत होती'.
'विरोधी पक्षातील नेते अन् पत्रकारांच्या फोनवर नजर''; ठाकरे गटाच्या खासदाराकडून बावनकुळेंच्या अटकेची मागणी'याच त्रासाला कंटाळून तिनं मोठं पाऊल उचललं. जून रोजी या घटनेवर आवाज उठवण्यासाठी डीवायएसपींकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, योग्य ती कारवाई झालेली नाही', अशी माहिती मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या आतेभावाने दिली. डॉक्टर महिलेवर राजकीय दबाव असल्याची माहिती आतेभावाने दिली. 'जून महिन्यात संपदा मुंडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी खासदार आणि २ पीएचा उल्लेख केला होता. तसेच काही पोलिसांची नावे घेतली होती', अशी माहिती महिला डॉक्टरच्या आतेभावाने दिली.
धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेहया प्रकरणी आतेभावाने योग्य कारवाईची मागणी केली आहे. 'महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी झाली पाहिजे. नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळाय़ला पाहिजे', अशी मागणी डॉ. महिला डॉक्टरच्या आतेभावाने केली.