CD Ratio म्हणजे काय? बिहारमध्ये प्रशांत किशोर काय म्हणाले? समजून घेऊया
Tv9 Marathi October 25, 2025 05:45 PM

What is CD Ratio: बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून वेगवेगळे मुद्दे निवडणुकीच्या मैदानातून चर्चेत येत आहेत. प्रशांत किशोर यांनी देखील CD Ratio मध्ये सुधारणा करण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि हा CD Ratio म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न चहुकडे विचारला जाऊ लागला. चला तर मग CD Ratio विषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीचे निकाल 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांनी CD Ratio म्हणजेच क्रेडिट-डिपॉझिट रेशोचा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पीके म्हणालेत की, बिहारमध्ये CD Ratio वाढवण्याची गरज आहे.

प्रशांत किशोर नेमकं काय म्हणाले?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, “बिहारमधून केवळ लोकांचे स्थलांतर होत नाही तर भांडवलाचे स्थलांतरही होत आहे. बिहारमध्ये CD Ratio 40 टक्के आहे. यामुळे बँका दरवर्षी 2 ते 2.5 लाख कोटी रुपये इतर राज्यांमध्ये हस्तांतरित करतात, जिथे उद्योग उभारले जात आहेत. जर CD Ratio राष्ट्रीय सरासरीपर्यंत म्हणजेच 40 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढवला तर बिहारमधील लोकांना रोजगारासाठी 2 ते 2.5 लाख कोटी रुपये उपलब्ध होतील.

गेल्या 35 वर्षांत बँकांनी सुमारे 25 लाख कोटी रुपये इतर राज्यांना हस्तांतरित केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बिहारच्या बँकांमध्ये 4 लाख 21 हजार कोटी रुपये जमा झाले होते, परंतु बँकांनी केवळ 1 लाख 61 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले. बिहारमधील लोकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भांडवलाची उपलब्धता वाढविणे हा जन सुराजचा मंत्र आहे. यासाठी बँकांच्या सहकार्याने CD Ratio सुधारावे लागेल.’’

CD Ratio म्हणजे काय?

CD Ratio म्हणजे बँकांनी दिलेल्या कर्जाचे जमा केलेल्या पैशाचे गुणोत्तर. उदाहरणार्थ, जर एखाद्या बँकेकडे 100 रुपये ठेव असेल आणि बँकेने 70 रुपये कर्ज दिले असेल तर त्याचे CD Ratio 70 टक्के असेल. याला आर्थिक क्रियाकलापांच्या गतीचे मोजमाप देखील म्हटले जाऊ शकते, कारण उच्च CD Ratio म्हणजे बँका अधिक कर्ज देत आहेत.

CD Ratio काढण्याचे सूत्र

CD Ratio (%) = (एकूण कर्ज किंवा क्रेडिट / क्रेडिट) एकूण ठेवी) × 100 म्हणजेच, एकूण बँक कर्जाला एकूण ठेवीने भागून आणि 100 ने गुणाकार करून CD Ratio मोजले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.