CSIR UGC NET December Exam 2025 Application Deadline Extended: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) सीएसआयआर यूजीसी नेट डिसेंबर सत्र २०२५ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार अद्याव नोंदणी करू शकले नाहीत, त्यांना आता अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.
पूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २४ ऑक्टोबर होती, परंतु ती वाढवून आता २७ ऑक्टोबर २०२५ करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट csirnet.nta.nic.in वर जाणून अर्ज करू शकता.
Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार परीक्षा कधी होणार?सीएसआयआर यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षा १८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT) स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.
दोन सत्रांत परीक्षापहिले सत्र: सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता
दुसरे सत्र : दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता
कोणासाठी असते ही परीक्षा?सीएसआयआर नेट परीक्षा ही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना ज्युनिअर रिसर्च फेलोशिप असिस्टंट प्रोफेसर पात्रता, तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरवले जाते.
अर्जात दुरुस्तीची संधीएनटीएने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्जातील चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान वेळ दिला जाईल. या तारखेनंतर कोणतीही सुधारणा किंवा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची प्रक्रियाअधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic.in वर भेट द्या.
“New Registration” लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख प्रवेशपत्रअर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एनटीएकडून पात्र उमेदवारांचे Admit Card अधिकृत वेबसाइटवर वेळेत अपलोड केले जातील. उमेदवारांनी ते डाउनलोड करून परीक्षेच्या दिवशी केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.