ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने मागे पळत जात अप्रतिम कॅच घेतला.
परंतु या झेलानंतर लगेचच त्याला मैदानातून बाहेर जावे लागले.
श्रेयसच्या झेलामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा ओघ थांबला, परंतु त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारी (२५ ऑक्टोबर) वनडे मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाने धावांचा ओघ कायम ठेवला असला, तरी भारतीय संघाच्या गोलंदाजांनीही मोठ्या भागीदाऱ्या होण्यापासून रोखल्या आहेत. यादरम्यान, भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने अफलातून झेल घेतला, मात्र त्यानंतर त्याला लगेचच मैदान सोडावे लागले आहे.
Shreyas Iyer ने कसोटी क्रिकेटमधून का घेतला ब्रेक? अखेर स्वत:च सांगितलं नेमकं खरं कारण कायझाले असे की ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात करताना ६१ धावांची सलामीला भागीदारी केली. पण ही भागीदारी रंगत असताना आणि धोकादायक ठरेल असं वाटक असतानाच मोहम्मद सिराजने हेडला २९ धावांवर माघारी धाडले.
त्यानंतर मिचेल मार्शला अक्षर पटेलने ४१ धावांवर त्रिफळाचीत केले. पण नंतर मॅथ्यू शॉर्ट आणि मॅथ्यू रेनशॉ यांच्यात भागीदारी रंगली होती. पण त्यांची भागीदारी मोठी होणार नाही, याची काळजी वॉशिंग्टन सुंदरने घेतली. त्याने शॉर्टला ३० धावांवर विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. परंतुस नंतर रेशनॉला साथ देण्यासाठी ऍलेक्स कॅरी आला. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली.
मात्र, ३४ व्या षटक महत्त्वाचे ठरले. हर्षित राणा गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर कॅरीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, चेंडू उंच हवेत उडाला. त्यावेळी श्रेयस अय्यर बॅकवर्ड पाँइंट पासून मागे पळत येत होता. त्याने सूर मारत चेंडू झेलला, यावेळी एकदा त्याच्या हातून चेंडू उडाला होता, पण त्याने तो जमीनीवर पडण्यापूर्वी पुन्हा पकडला होता.
AUS vs IND, 3rd ODI: भारताच्या Playing-XI मध्ये कुलदीप यादवला संधी, पण नितीश रेड्डीच्या न खेळण्याचं खरं काय कारण? BCCI कडून खुलासाश्रेयसने हा झेल पूर्ण केला, मात्र या प्रयत्नात श्रेयस त्याच्या डाव्याबाजूला जोरात पडला. यामुळे त्याच्या बरगड्यांच्या जवळ त्याला असह्य वेदना झाल्याचे दिसले. झेल घेतल्यानंतर तो मैदानावरच झोपला होता.
त्यामुळे भारतीय संघाच्या फिजिओला मैदानात यावे लागले. त्यांनी श्रेयसच्या वेदना पाहाता, त्याला मैदानातून बाहेर नेले. मैदानातून बाहेर जातानाही श्रेयसला त्रास होताना दिसत होते. त्यामुळे हा झेल घेतला असला, तरी श्रेयसच्या दुखापतीने भारतीय संघाची चिंता वाढली असेल.
श्रेयसची दुखापत गंभीर नसावी अशी आशा भारताची असेल. कारण श्रेयस सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून भारताला या सामन्यात धावांचा पाठलागही करायचा आहे. श्रेयसने दुसऱ्या सामन्यात ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान, श्रेयसने घेतलेल्या झेलानंतर ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू रेनशॉ (५६), मिचेल ओवेन (१) आणि मिचेल स्टार्क (२) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या.