Pune News: पुण्यात वेगवेगळ्या घरफोड्यांत ४२ लाखांचा ऐवज लंपास
esakal October 26, 2025 04:45 AM

पुणे : दिवाळीत शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ४२ लाख रुपयांचा ऐवज चोरला. कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई आणि हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा वाडेबोल्हाई-राहू रस्त्यावर बंगला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता. २१) सायंकाळी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी पूजा ठेवली होती. दुसऱ्या दिवशी पूजेतील ऐवज पुन्हा कपाटात ठेवण्यात येणार होते.

चोरट्यांनी मध्यरात्री स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. देवघरात मांडलेल्या पूजेतील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलिसांनी व्यावसायिकाच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलिस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

Pune Crime : दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांची शहरात 'दिवाळी'! बंद घरे आणि दुकाने फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

कोथरूड भागात सदनिकेतून चोरट्यांनी आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील लोकमान्य कॉलनीत एका सोसायटीत राहायला आहे. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी बेडरूममधील कपाट उचकटून आठ लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.