Summary -
शरद पवारांना पुण्यातील राजकारणात मोठा धक्का बसणार
उत्तर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत
अतुल देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
विधानसभेच्या उमेदवारीवरून नाराजी आणि पक्षांतर्गत कलह या कारणामुळे ते पक्षाची साथ सोडणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची साथ सोडून तुतारी फुकणारा नेता आता धनुष्य बाण हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उत्तर पुणे जिल्ह्यात बळ देणारं नेतृत्व मिळणार आहे. अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यातील तरुणांमधले लोकप्रिय नेतृत्व मानलं जातात.खासदार अमोल कोल्हेंच्या विजयात अतुल देशमुखांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! पालिका निवडणुकांआधीच दमदार नेत्याचा राजीनामाऐनवेळी विधानसभेला उमेदवारी नाकारल्याने नाराजी अन् स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत दुफळी असल्याने अतुल देशमुख हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सांगितले जात आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील नवे राजकीय समीकरण घडवणारी ही मोठी राजकीय हालचाल ठरणार आहे.
Maharashtra Politics: 'सर्वांवर आमची करडी नजर, बंडखोरी केली तर...', चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दमदरम्यान, यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जिल्ह्यात मोठे धक्के बसले होते. बुलडाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही हे नेते शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. पण आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलडाण्याच्या जिल्हाध्यक्षा रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या तिघांनी शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केला.
Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार