साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. आता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी तातडीने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा, असे आदेश दिले आहेत. यामुळे आता याप्रकरणाच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. डॉ. संपदा मुंडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी संपदा मुंडेने पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईलयाप्रकरणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फलटण येथील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट सापडली आहे दोन पोलिस आधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलिस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल… जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल, असे विधान पंकज भोयर यांनी केले होते.