चारकोपमध्ये मनसेचा दीपोत्सव
कांदिवली, ता. २३ (बातमीदार) ः चारकोप येथे पहिल्यांदाच बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष कबीरदास (विश्वास) मोरे यांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दीपोत्सवाचे उद्घाटन मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या दीपोत्सवानिमित्त चारकोप मार्केट ते चारकोप बस आगार या संपूर्ण मार्गांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.