आळेफाटा, ता. २५ ः शेतमाल दराविषयी अजूनही कमलाची अस्थिरता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोरेज सारखा पर्याय स्वीकारून योग्य वेळी मालाची विक्री केली पाहिजे. त्यासाठी गावोगावी कोल्ड स्टोरेजची उभारणी व उपयोगिता निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य कृषी (प्रक्रिया व नियोजन) विभागाचे संचालक विनयकुमार औटी यांनी राजुरी येथे केले.
कृषी संचालक पदी औटी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी, खरेदी-विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे, दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष औटी, उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, गोपाळा औटी, बाळासाहेब हाडवळे, तुकाराम डुंबरे, ज्ञानेश्वर घंगाळे, साईनाथ हाडवळे, गंगाराम औटी, विक्रम डुंबरे, मोहन हाडवळे, निलेश हाडवळे, संजय औटी, किसन गुळवे,शितल औटी, कल्पना बांगर, ज्योती हाडवळे, किरण औटी, संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे आदी उपस्थित होते.
औटी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक पद्धती वापराव्यात, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आम्हा अधिकाऱ्यांचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम औटी यांनी केले. प्रास्ताविक मोहन हाडवळे यांनी केले. तर, निलेश हाडवळे यांनी आभार मानले.