Latest Marathi News Live Update : पुणे - सोलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीत रूग्णवाहिका देखील अडकल्या!
esakal October 27, 2025 01:45 AM
१ नोव्हेंबरच्या मोर्चाची विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी

सदोष मतदारयाद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी एक नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयावर महाविकास आघाडी - मनसेने आयोजित केलेल्या मोर्चासाठी विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

धंगेकरांचं मोदींना पत्र

पुण्यातील सध्या गाजत असलेल्या जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांच्या राजीनाम्यासाठी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून मागणी केली आहे.

जSatara Live : गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nashik News: लासलगावला डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून दिलासा

लासलगावच्या नागरिकांना अखेर डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. शिव नदीच्या काठावर असलेल्या कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी आणि धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पण राज्याचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्याने आता या समस्येवर तोडगा निघाला.

Mumbai Crime: मालाडमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला

मालाड परिसरात ८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला पोलिसांनी आरोपी अजय यादव (वय ३४) याला केवळ नोटीस देऊन सोडून दिले होते. मात्र, या निष्काळजीपणाविरोधात मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.

Mumbai Rain: मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस कोसळत आहे सांताक्रुज, गोरेगाव,अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हवेत गारवा वाढला असून सकाळपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस कोसळत आहे.

Mumbai Traffic News: मुंबईच्या पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईच्या पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आरे ब्रिजवर टेम्पो आणि कारमध्ये अपघात झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वांद्रे कडून बोरिवलीचे दिशेने जाणारा मार्गावर गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी विलेपार्ले सांताक्रुज या सर्व परिसरात ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वांद्रे ते गोरेगाव 15 ते 20 मिनिटांच्या प्रवास मात्र या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना एक ते दीड तासांमध्ये करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून क्रेनच्या सहाय्याने टेम्पो आणि कार बाजूला घेऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Nashik Rain News: परतीच्या पावसाचा डबल धक्का! पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

लासलगाव परिसरात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. शनिवारी तब्बल ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आणि त्याचा थेट फटका बसला तो पिंपळगाव (नजीक) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीसाठी तयार कांदा आणि नव्याने लागवड केलेली रोपे — दोन्ही पिके पाण्याखाली गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

Akola News: भिंत अंगावर कोसळून चिमुकला जागीच ठार

वादळी वारा आणि पावसामुळे दगड व मातीच्या घराची भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. शेख हसनैन शेख बिस्मिल्लाह कुरेशी असे ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

Jalgaon Live: रिल बनवणं जीवावर बेतलं! रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोन युवकांचा रिल बनवतांना रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. पाळधी येथील प्रशांत खैरनार व हर्षवर्धन नन्नवरे हे दोन युवक सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिल बनवण्यासाठी चांदसर रेल्वे गेट जवळ शुट करीत असतांना अहमदाबाद हावडा एक्सप्रेसची धडक बसल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

Nashik Live: निफाडमधील मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान, उत्पादनात घट होण्याची शक्यता

निफाडमध्ये रात्रभर कोसळलेल्या पावसाने द्राक्ष इंडस्ट्रीचे कंबरडे मोडले असून फळबहार छाटणी केलेल्या द्राक्षबागांत पाणी साचल्याने मुळांच्या विकासाला खंड पडत आहे. पोंगा अवस्थेतील द्राक्षबागांमध्ये डावणी करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रतिबंधासाठी औषधांची फवारणी करण्यासाठी द्राक्षबागेत पावसाने तयार झालेला चिखल अडसर ठरत आहे. यामुळे सरासरी उत्पादनात चाळीस टक्के घट होण्याची शक्यता आहे.

Nashik Rain Update: नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला असून अवघ्या २ तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे काढणीसाठी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान तहसीलदार अभिजित बारवकर यांनी पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कृषी विभाग व महसुल विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तर रविवारी पुन्हा दुपारी पावसाने सुरवात केली असुन या अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत

Nashik Rain: परतीच्या पावसाने मनमाड जलमय! नद्यांना पूर, घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण

नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार, मनमाड आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील पांझण आणि रामगुळना या नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. नदीकाठच्या गवळीवाड्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Indapur Live : इंदापूरमध्ये राजकीय भूकंप! हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार भरणे गोटात जाणार

इंदापूरमध्ये पुन्हा राजकीय खळबळ! माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या तंबूतले तीन प्रमुख कार्यकर्ते लवकरच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Supriya Sule Live : महिला डॉक्टर प्रकरणी पारदर्शक एसआयटीची मागणी; "महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे" – सुप्रिया सुळे

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “संबंधित कुटुंबाशी माझी चर्चा झाली असून सरकारने कोणत्याही राजकीय दबावाविना पारदर्शी तपास करणारी एसआयटी नेमावी. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे.”

Pune Live : विमानतळ भ्रष्टाचार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप!

रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर विमानतळाशी संबंधित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करून मोहोळ यांनी मुंबई फ्लायिंग क्लबला विशेष लाभ मिळवून दिला, ज्यामुळे हवाई उड्डाण विभागाला तब्बल १९७ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

धंगेकर यांनी दावा केला की, या व्यवहारातून फायदा मिळवून दिलेल्या मुंबई फ्लायिंग क्लबने विशाळ गोखले यांच्यासाठी खासगी जेट पाठवले होते. यामागे नेमकी कोणत्या प्रकारची दलाली झाली, हे तपासाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले असून, याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.

Eknath Shinde Live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

एकनाथ शिंदेंनी रविंद्र धंगेकरांना पुण्यातला धंगेकर आणि मोहोळ यांच्यातला वाद संपवुन टाका असं म्हटलं

मात्र तरीही जैन मंदिराची जागा मोकळी झाल्याशिवाय धंगेकर थांबणार नसल्याचे धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे

Nashik Live : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार शेतीचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात काल रात्री झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गोळेगाव, गोंदेगाव,आणि मरळगोई परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

या अतिवृष्टीमुळे परिसरातील नद्यांना पूर आला असून, काही ठिकाणी बंधारे फुटल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरले.

या पाण्यामुळे विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात नद्यांचे पाणी शिरल्याने उभ्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Live: संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबाकाका यांची पालखी तेर येथुन कार्तिक एकादशीच्या वारीसाठी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे.

आज धाराशिव शहरात संत गोरोबा कुंभार यांच्या पालखीचे फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तर गोरोबाकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला मात्र आपलं दुःख विसरून शेतकरी वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आतुर झालेला पाहायला मिळाला.

Live: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाची चव्हाट्यावर

आगामी आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबईला वारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यां बद्दल केली नाराजी व्यक्त,

जुन्या व निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांचे तुम्ही काही ऐकू नका, कंभरणाऱ्याला पहिले तू किती निवडणुका लढवल्या याबाबत विचारणा करा असं म्हणत सध्या पक्षामध्ये कान भरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली

Live: चांदसैली घाटातील सातपायरी वळणार कोसळली दरड

चांदसैली घाटातील सातपायरी वळणार पावसामुळे कोसळली दरड ...

उंच शिखर वरून दगडाचा भला मोठा खच रस्त्यावर आल्याने घाट मार्ग बंद ....

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या चांदसैली घाट बंद ....

दरड रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याने वारंवार कोसळते दरड ....

घाटमार्ग बंद झाल्यानंतर अनेक वाहने अडकली घाटात ....

Amravati Live : बडनेरामध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

बडनेरा येथील ही युवती असून तिने घरी फासावर लटकून केली मध्यरात्री आत्महत्या..

रणदीप कौर रियाड असं मृत युवतीचे नाव असून ती

MSC शिकलेली असून ती एका खाजगी कोचिंग क्लासेसवर शिकवत होती...

या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत

Nashik Live: नाशकात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

येवल्यातील अपघातांचा सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये महिन्याभरात रस्त्या अपघातामध्ये चार ते पाच जणांचे बळी गेले असून आज सकाळी विंचूर चौफुली या ठिकाणी विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी गेला आहे.

Liveupdate: 'हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत...'-मनोज तिवारी

बिहार: भाजप खासदार मनोज तिवारी म्हणतात, "हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत. वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मंजूर झाले आहे, विधानसभेत नाही... एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार बोलावे... तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. जेव्हा तुम्ही (राजद) सरकारमध्ये होता तेव्हा गुन्हेगारांनी राज्य केले. हे लोक (राजद) 'जय शहाबुद्दीन'चा जयघोष करत होते... तेजस्वी यादव यांची जीभ ५६ इंच लांब आहे तर एनडीएची छाती ५६ इंच आहे... त्यांची ओळख बिहारला लुटणे आहे... आता, एनडीए मोठे पूल बांधेल, रोजगार देईल, एम्स देईल आणि बिहारला अधिक मदत देईल..."

Satara LiveUpdate: फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

आत्महत्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थी युवक काँग्रेस कडून आंदोलन

Supriya Sule : महिला डॉक्टर यांच्या कुटुंबीयांना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन द्वारे संवा

कुटुंबीयांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना सांगण्यात आले की तपास करत असताना स्थानिक पोलीस हस्तक्षेप करत आहेत.

तपास एस आय टी कडे देण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसोबत फोन द्वारे संवाद साधत या प्रकरणांमध्ये जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपी पर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.

सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असा विश्वास यावेळी दिला यावेळी कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांना संपूर्ण व्यथा सांगितल्या.

Nashik Live : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

- जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्यासोबतच ग्रेड सेपरेटर फ्लॉय ओव्हरच्या कामासाठी इंदिरानगर बोगदा राहणार बंद

- महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून सुरू करण्यात येणार काम

- इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन

Devendra Fadanvis : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

Devendra Fadanvis : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत.

या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन सुद्धा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गेल्या दोन दिवसापासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण गाजत असताना आज मुख्यमंत्री फलटणमध्ये येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Bhandara Live : भंडाऱ्याला पावसाने झोपडले

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

CM Devendra Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर आहेत.येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार आहे. 

Amravati News Updates : अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं शेकडो क्विंटल सोयाबीन भिजलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Live News Updates : इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री एसटीला आग

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले.

Beed News Live Updates : मंत्री पंकजा मुंडे महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भेटीला

मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांची मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या मूळ गावी जात भेट घेतली. माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मी आता संपुर्ण माहिती घेतली आहे. तिच्या जुन्या काही कंप्लेंट आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायमध्ये कोण आहे किंवा नेमकं काय घडलंय याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे.

Pune News Live Updates : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग सुरू झालीय. यामुळे महामार्गावर कोंडीची शक्यता आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतण्यास सुरुवात झालीय. या प्रवाशांच्या मोटारी खाजगी बस यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक आणि वाहन चालकांना महामार्ग यांच्यापर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.