अकाेला : शहरातील वाशीम बायपासवरील पॉवर हाऊस येथे एका ३५ वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे (वय ३५, रा. सांगवी मोहाडी) असे मृताचे नाव आहे. तंबाखे हे दोन ते तीन वर्षांपासून पॉवर हाऊसवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.
शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेचे काम करत असताना वीज प्रवाह सुरू असतानाच त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
Akola News : विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यूसहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.