Gold Rates Today : सोनं १० हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही ३३ हजारांची घसरण; आज काय आहेत दर?
esakal October 28, 2025 07:45 PM

Gold and Silver Price Today: गेल्या आठवड्यात उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात गेल्या पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ४ हजार डॉलर प्रती औंस इतका कमी झाला आहे. देशांतर्गत बाजारातही सोनं स्वस्त झालंय. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. लग्नाच्या हंगामाआधी सोने-चांदीचे दर कमी झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचा दर २७ ऑक्टोबरला सायंकाळी १ लाख २१ हजार ७७ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. तर सोमवारी सकाळी हाच दर १ लाख २२ हजारांच्या वर होता. काही तासातच सोन्याचा दर १३२५ रुपयांनी कमी झाला. तर चांदी सोमवारी दिवसभरात प्रतिकिलो २९९९ रुपयांनी स्वस्त झाली. एक किलो चांदीचा दर सोमवारी सायंकाळी १ लाख ४५ हजार ३१ रुपये इतका होता.

Gold Investment : डिजिटल गोल्ड की फिजिकल गोल्ड, कोणत्या सोन्याच्या खरेदीत फायदा आहे? डिजिटल सोने नक्की सुरक्षित आहे का ?

गेल्या दहा दिवसात सोन्याचा दर जवळपास १० हजार रुपयांनी कमी झाला आहे. १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजार ८७४ रुपये इतका होता. तर सोमवारी सायंकाळपर्यंत ९ हजार ७९७ रुपयांच्या घसरणीसह तो १ लाख २१ हजारांवर पोहोचला. चांदीसुद्धा ३३ हजार रुपयांनी गेल्या दोन आठवड्यात स्वस्त झालीय. १४ ऑक्टोबरला चांदीचा दर १ लाख ७८ हजार १०० रुपये होता. तर सोमवारी हाच दर १ लाख ४५ हजारांवर पोहोचला.

ऐन सणासुदीला सोने - चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता सण संपताच दरात मोठी घसरण झाली आहे. सण संपल्यानंतर दागिन्यांची मागणीही घटली आहे. त्यामुळे दर घसरल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमागे जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. पण लाँग टर्ममध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.