माेठी बातमी! 'दिलीप मानेंच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक'; राजन पाटील, यशवंत माने, शिंदेंचं ठरलं; बुधवारी भाजप प्रवेश..
esakal October 28, 2025 08:45 AM

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले ऑपरेशन लोटसमधील महत्त्वाचा टप्पा बुधवारी (ता. २९) पूर्ण होणार आहे. यामध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे या तिघांचा मुंबईतील सकाळी अकरा वाजता भाजप पक्ष कार्यालयात प्रवेश होणार आहे. मात्र, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे सोलापूर बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला तूर्त ब्रेक लागला आहे.

Highway Traffic: संपली सुटी; महामार्गावर प्रवाशांची गर्दी; कोल्हापूर नाका, मलकापुरात वाहनचालक वैतागले..

फलटणच्या (जि. सातारा) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जिल्ह्यातील तीन बड्या नेत्यांच्या प्रवेशाची वेळ ठरली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी झाली. माने यांना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, पक्षाने कार्यकर्त्यांच्या विरोधाची दखल घेत माने यांचा प्रवेश पुढे ढकलला आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात माने यांच्या प्रवेशावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत दिलीप माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी आज माजी आमदार पाटील, दूध संघाचे अध्यक्ष शिंदे हे फलटणमध्ये दाखल झाले होते. फलटणमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबतच्या पहिल्या रांगेत माजी आमदार पाटील यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. फलटणमध्येच आज मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गोरे, माजी आमदार पाटील, दूध संघाचे अध्यक्ष शिंदे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रवेशाची तारीख ठरविण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी फोन करून वैयक्तिक या तीनही नेत्यांना बुधवारची तारीख सांगितल्याचे समजते.

भाजप प्रवेशाची तारीख ठरल्यानंतर माजी आमदार पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रवेशाची तारीख आणि मुंबईचा उल्लेख असलेल्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने जिल्ह्यात स्व-बळ वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

आमच्यासाठी व आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही जिथे जाऊ तिथे निष्ठेने राहू. आज फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली. यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे.

- राजन पाटील, माजी आमदार, मोहोळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.