काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला होता, अहमदाबादवरून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्येच कोसळलं, या विमानात एकूण 242 प्रवासी होते, त्यातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, आता अशीच एक आणखी दुर्दैवी घटना घडली आहे. विमानाचा भीषण अपघात झाला आहे, यामध्ये विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
हा विमान अपघात केनियाच्या क्वाले काउंटीमध्ये मंगळवारी झाला आहे, बारा प्रवाशांना घेऊन निघालेलं हे विमान कोसळलं, या अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान दियानी येथून प्रसिद्ध मसाई मारा क्षेत्रातील किचवा टेम्बो येथे जाण्यासाठी निघाले होते, याचदरम्यान वाटेतच हा अपघात झाला आहे, अपघातानंतर विमानाला आग लागली आणि त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला, या विमानातून एकूण 12 प्रवासी प्रवास करत होते, त्या सर्वांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही, अशी माहिती केनियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले, त्यांच्याकडून अपघाताची पहाणी करण्यात आली, मात्र या अपघातामध्ये एकही प्रवासी वाचू शकला नाही. आता हा अपघात नेमका कसा झाला? त्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
विमान कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली, विमानाचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्यामध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. विमानाचे पार्ट परिसरात दूरवर उडाले आहेत. ही घटना दुर्दैवी असून, आम्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत करू असं केनिया सरकारने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद आणि त्यानंतर बांगलादेशात देखील असाच एक अपघात झाला होता, बांगलादेशात शाळेवर विमान कोसळलं होतं.