महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भाला ऑरेंज अलर्ट
शेतकऱ्यांना कापूस, तूर आणि भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान
धुळे जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. पावसाळा ऋतू संपला तरी राज्यातील विविध भागात पावसाचा कहर सुरु आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके आडवी झाली आहेत. महाराष्ट्रातील बळीराजावरील संकट अद्याप संपलेलं नाही. राज्यातील काही भागात आणखी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचे संकटाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात आजपासून पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात मोंथा चक्री वादळाचा विदर्भाला फटका बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहे. शेतात उभे असलेले पीक पावसामुळे झोडपले जाणार आहेत. कापूस, तूर, संत्रा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांसह नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकलामोंथा चक्रीवादळ जसं जसं पुढे सरकत जाईल, तसा तसा त्याचा प्रभाव कमी होत जाईल. विदर्भासह लगतच्या राज्यांनाही मोठा चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं.
Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी धुळ्यात पावासाचा कहरधुळ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचाकहर सुरू आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सलग चौथ्या दिवशी पावसाने धुळ्यात जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.