'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. तेजस्विनीने शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या मोठ्या मुळाशी समाधान सरवणकर याच्याशी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यांच्यांफोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला होता. आता साखरपुड्यानंतर तेजस्विनीची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसतेय.
तेजस्विनीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यात तिची काही आठवड्यांपूर्वीची मुलाखत देखील आहे. तेजस्विनी गेल्या १७- १८ वर्ष मराठी सिनेसृष्टीचा भाग आहे. मात्र अजूनही ती सिंगल आहे. तू अजूनही लग्न का केलं नाही याबद्दल तिला विचारणा करण्यात आली होती. दिसायला सुंदर, घारे डोळे...लोकप्रिय अभिनेत्री म्हटल्यानंतर तुला तर लग्नाच्या अनेक मागण्या येत असतील, तरीही तू अजून लग्न केलं नाही? असा प्रश्न तेजस्विनीला विचारण्यात आला होता. त्यावर तेजस्विनी म्हणालेली, 'याला माझा निषेध आहे...मला आजपर्यंत एकही स्थळ आलं नाहीये. इतकंच काय तर माझ्या वडिलांनाही विचारा.'
View this post on InstagramA post shared by Vinayak Sugavekar (@vinayak_makeup)
ती पुढे म्हणाली, 'आता मला खरंच थोडं वाईटही वाटायला लागलंय. आता अनेक कलाकारांची लग्न झाली, साखरपुडे होतायत... हिचं पण लग्न झालं, अरे तिचं पण झालं..असं वाटतं मला.. माझ्या बाबांनी अनुरुपवर रजिस्टर केलं होतं. पण काही नाही झालं, असं तेजस्विनीनं म्हटलं होतं. ५० जणांनी प्रपोज केलं असेल, लग्नासाठी एकही स्थळ आलं नाही. पण लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्य पार्टनर भेटला की नक्की लग्न करणार. असं ती म्हणाली होती. तेजस्विनी सध्या ३६ वर्षांची आहे. वयाच्या ३६व्या वर्षी ती बोहोल्यावर चढणार आहे.
पत्नीमुळे उदय सामंत आले अडचणीत? बालनाट्य स्पर्धेमध्ये राजकीय दबाव, काय आहे नवा वाद