कर्जत : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत व माथेरान नगर परिषद, जिल्हा परिषदेचे सहा वॉर्ड आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संकल्प भवन येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आल्या. या मुलाखतीदरम्यान जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिणेदार, नितीन पाटील, कर्जत ग्रामीण संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे आणि कर्जत शहर मंडळ संपर्कप्रमुख नरेश पाटील उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना कर्जतशहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी सांगितले, की निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षपूर्णपणे सज्ज आहे. पक्षश्रेष्ठींनी युती किंवा आघाडीबाबत जो काही निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल; मात्र जर कोणत्या कारणामुळे युती झाली नाही तरीही भाजप मागे पडणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची सर्व तयारी करून ठेवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Konkan Railway: कोकणकरांची २५ वर्षांची प्रतीक्षा संपली! दादर-दिवा पॅसेंजरच्या जागी नवी ट्रेन धावणार; कुठे आणि कधीपासून?शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत बोलताना लाड म्हणाले, की गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विजयात भाजप कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. लोकसभा असो की विधानसभा प्रत्येक निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जर युती झाली, तर शिवसेनेने मोठे मन दाखवून भाजपला नगराध्यक्षपद किंवा प्रभागनिहाय उमेदवारीत योग्य वाटा द्यावा. फक्त मतदानापुरता कार्यकर्त्यांचा वापर न करता सत्तेतील सहभागदेखील दिला पाहिजे, अशी अपेक्षा राजेश लाड यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २ मधून शरद लाड यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी सांगितले की मी १९९९ पासून कर्जत नगर परिषदेत नगरसेवक राहिलो आहे. या काळात अनेक कामे मी मार्गी लावली आहेत. तसेच या प्रभागातील जनतेचीदेखील माझ्या उमेदवारीसाठी इच्छा असल्याने पक्षाने मला पुन्हा संधी दिल्यास माझा विजय निश्चित आहे, असे शरद लाड यांनी पक्षाला कळविले असल्याचे सांगितले.
Mumbai News: शीव येथील बंद सायकल मार्गिकेवरील कचरा हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश