वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या नव्या विजेत्यासाठी आता फक्त दोन सामन्यांचा अवधी आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचतं याची उत्सुकता आहे. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आात दुसरा उपांत्य फेरीचा सामना 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. यापूर्वी दोनदा अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आता उपांत्य फेरीतच ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान आहे. साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठलं होतं. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी भारताला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सातवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. इतकंच काय तर 2005 मध्ये अंतिम फेरीत टीम इंडियाला 98 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. पण टीम इंडियाला आठ वर्षापूर्वी केलेल्या कामगिरीचं स्मरण करावं लागणार आहे. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला होता. तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकात 4 गडी गमवून 281 धावा केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाला 245 धावांवर बाद केलं होते. तेव्हा हरमनप्रीत कौरने 171 धावांची नाबाद खेळी केली होती.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया खूपच पुढे आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात 14 सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 11 वेळा भारताला पराभवाची धूळ चारली आहे. तर भारताने फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. पण भारताचं होम ग्राउंड असून भारत ऑस्ट्रेलिया धोबीपछाड देऊ शकते. कारण भारताने साखळी फेरीत तीन सामने जवळच्या फरकाने गमावले होते. त्यामुळे भारताची ताकद चांगली आहे. पण प्रतिका रावल दुखापतग्रस्त होत संघाबाहेर पडली आहे. त्यामुळे शफाली वर्माला संघात जागा मिळाली आहे. आता हा बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडतो की महागात पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.