उरुळी कांचन, ता. २९ : कोरेगावमूळ (ता. हवेली) विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव नामदेव कोलते यांची बिनविरोध झाली. सोसायटीचे अध्यक्ष अंकुश कड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर नव्याने ही निवड पार पडली. निवडणूक अधिकारी संतोष तळपे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक ताराचंद कोलते, माजी अध्यक्ष सुरेश भोसले, माजी सरपंच मंगेश कानकाटे, माजी अध्यक्ष अंकुश कड, उपाध्यक्ष चारुशीला सरडे, संचालक प्रमोद बोधे, संजय भोसले, लोकेश कानकाटे आदी उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष कोलते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्याने आणि पारदर्शकतेने काम करणार आहोत. सर्व संचालकांच्या सहकार्याने सोसायटीचा विकास हेच आमचे प्रमुख ध्येय राहील.’’
03435