जलसंधारण आणि वृक्ष संवर्धनासाठी बदलापूरच्या तरुणांचा पुढाकार, जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून 2.5 कोटी लिटर पाण्याची साठवण
Saam TV October 30, 2025 12:45 PM

बदलापूरजवळील चामटोली गावात ६,००० सीसीटी चर खोदून २.५ कोटी लिटर पाणी साठवले

जांभूळ ट्रस्ट आणि आदित्य गोळे यांच्या पुढाकाराने प्रकल्प सुरु

जलसंधारणामुळे शेती, विहिरी आणि बोअरवेल्सना वर्षभर पाणी मिळणार

या उपक्रमामुळे मृदा धूप रोखून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळाली आहे

मयुरेश कडव,

ग्लोबल वार्मिंग आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन बदलापुरातील तरुण निसर्गप्रेमी आदित्य गोळे आणि सहकाऱ्यांनी जलसंधारण तसच वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून बदलापूरपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामटोली गावात 6,000 सीसीटी खड्डे खोदले. त्यामुळे जवळपास 2.5 कोटी लिटर पाणी साठलय. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलीय. आता शेती, विहिरी तसंच बोअरवेल्सना हे पाणी बारमाही मिळणार आहे.

बदलापूर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळांना भौगौलिक मानांकन मिळालय. त्यानंतर जांभळांची लागवड आणि संवर्धनासाठी अगदी सुरूवातीपासून प्रयत्न करणाऱ्या जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने अंबरनाथ तालुक्यात जांभूळ बहुल बाग विकसीत करण्याचा निर्णय घेतला. त्यात जांभळांबरोबरच इतर फळझाडांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी वनविभागाने जांभूळ ट्रस्टला 25 एकर जागा लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहे.

Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जागा ताब्यात मिळाल्यावर ट्रस्टने तिथे 6 हजार चर खोदले. यंदा पावसाळा लांबल्यामुळे या चरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरलय. त्यामुळे भूजल साठ्यात मोठी भर पडलीय. इथल्या डोंगर भागात तसच नैसर्गिक ओढ्यात अंदाजे 2.5 कोटी लिटर्स जलसंवर्धन झाल्याची माहिती ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली.

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

या जलसंवर्धन मोहिमेचा दुहेरी फायदा म्हणजे मोकळ्या माळरानांवर चर खोदून वृक्ष लागवड केली तर जमिनीची धूप थांबेल. शिवाय पाणी जमिनीत मुरेल. अतिवृष्टीमुळे नदीला येणाऱ्या पुरावरही नियंत्रण मिळवता येईल, आत्या अशाच प्रकारे बदलापूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये याच पद्धतीने जलसंवर्धन आणि वृक्ष लागवड करून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा मानस जांभूळ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.