लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय
माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
माजी आमदार बबन खंदारे आणि गणेश हाके यांची भाजपमध्ये घरवापसी
नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांचाही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश
या पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार
संदिप भोसले, साम टीव्ही
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील विविध नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिकेचा डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून पक्षप्रवेश सोहळे सुरु झाले आहेत. नंदूरबारनंतर आता लातूरमध्ये भाजपने मोठा डाव टाकला. काँग्रेसच्या माजी बांधकाम सभापतींना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. भाजपच्या या खेळीने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकलास्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं आहे. लातूर मनपाच्या माजी बांधकाम सभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आमदार बब्रुवान खंदारे आणि आणि गणेश हाके यांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे.
Satara Doctor Case : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाची उडी; CM फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रियास्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून आज मुंबई येथे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात आलाय. आज नंदूरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.
लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा ठपका ठेवत भाजपाने निलंबित केलेल्या गणेश हाके आणि माजी आमदार बबन खंदारे यांचे देखील निलंबन रद्द करत भाजपने घर वापसी दिली आहे.
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट; सलग ३ दिवस पाऊस कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार?या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढली जाणार आहे. तर लातूर शहरात काँग्रेसला मोठ खिंडार पडलंय. तर येत्या काळात काँग्रेस मधील अनेकांचा प्रवेश भाजपमध्ये होईल, अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.