IND vs SA Test Series: तो परत आला...! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; ३ फिरकीपटूंचा समावेश
esakal October 28, 2025 03:45 PM

South Africa Test squad for India series : भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. १४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत भारतात ही मालिका होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने गतविजेत्यांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तेथील दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत समावेश नसलेल्या टेम्बा बवुमाचे ( Temba Bavuma ) भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघात पुनरागमन झाले आहे.

टेम्बा बवुमाला दुखापीतमुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. भारतीय खेळपट्टीवर होणाऱ्या मालिकेसाठी आफ्रिकेने सिमॉन हार्मेर, केशव महाराज व सेनुरन मुथूसामी या तीन फिरकीपटूंचा संघात समावेश करून घेतला आहे. या तिघांनी पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिका गाजवली आहे. कागिसो रबाडाच्या नेतृत्वाखाली जलदगती गोलंदाजांच्या फळीत कॉर्बिन बॉश, मार्को यान्सेन व विया मुल्डर यांचा सावेश आहे.

Breaking: भारतीय संघाला मोठा झटका; ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी शतक झळकावणाऱ्या खेळाडूची माघार, स्मृती मानधनासह सलामीला कोण?

पहिली कसोटी १४ नोव्हेंबरला कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवली जाईल, तर दुसरी कसोटी २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होईल. गुवाहाटी येथे होणारी ही पहिलीच कसोटी मॅच असेल. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले की, "पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या बहुतेक खेळाडूंना आम्ही संघात कायम ठेवले आहे. त्या मालिकेत या खेळाडूंनी जबरदस्त जिद्द दाखवली आणि पिछाडीवरून परत येत मालिका बरोबरीत आणली.

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

ते पुढे म्हणाले, भारतातही आम्हाला अशाच प्रकारच्या आव्हानाला सामोरं जावं लागेल आणि त्या परिस्थितीत दमदार कामगिरी करणारे हेच खेळाडू पुन्हा एकदा आमच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारतात खेळणं नेहमीच कठीण असतं आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Proteas Test Squad vs India : टेम्बा बवुमा ( कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवॉल्ड ब्रेव्हिस, टॉनी डी झॉर्झी, झुबायर हम्झा, सिमॉन हार्मेर, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरन मुथूसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, त्रिस्तान स्तब्स, कायले वेरेयने

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.