सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप; आता मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, नक
Marathi October 28, 2025 06:25 PM

फलटण डॉक्टर क्राईम न्यूज : साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने (Phaltan Doctor Crime New) राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे. आता आत्महत्या करणाऱ्या तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल (Phaltan doctor postmortem report) समोर आला आहे. रुग्णालायाकडून संबंधित मृत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. यामध्ये मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नसल्याचे समोर आले आहे.

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय? (Phaltan doctor postmortem report)

  1. मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत.
  2. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे उघड

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती- (CDR Of Phaltan Doctor)

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांत बनकर (Prashant Bankar) आणि निलंबित पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने (Gopal Badane) यांच्यासोबत मृत डॉक्टरचे कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत्यूच्या आधी देखील गोपाल बदनेसोबत कॉल झाल्याचे तपासात समोर आले. गोपाल बदने केवळ मैत्री शिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती आहे. हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेस्निक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

गोपाल बदाणे मोबाईल लॅपवाला-(पीएसआय गोपाल बदाणे)

अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badane) याच्याबाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत . फलटण येथील डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला व प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती .या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला . पण आता या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .

तरुणीच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट- (Phaltan Doctor Crime News)

मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली होती. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं होतं. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलेलं. पोलीस उपनिरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता. तसंच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय? (Phaltan Doctor Crime News)

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली . आत्महत्या पूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता. यामध्ये तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते .याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या .फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती .त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते.

संबंधित बातमी:

Satara Doctor Crime News: हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.