Ek Deewane Ki Deewaniyat: कमाई फक्त ४८ कोटी तरीही हिट, कोणत्या कारणाने 'एक दीवाने की दीवानियत' झाला सुपरहिट
Saam TV October 29, 2025 04:45 AM
  • हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा चित्रपट दिवाळीच्या वेळी प्रदर्शित झाला.

  • थामा चित्रपटासोबत ‘एक दीवाने की दीवानियत’ ची स्पर्धा

  • ‘एक दीवाने की दीवानियत’ हिट ठरत चित्रपटगृहात मारली बाजी

मागील आठवड्यात 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित झाले. या दोघा चित्रपटांमध्ये एक दीवाने की दीवानियत ने बाजी मारत हिट चित्रपटाच्या यादीत आपलं नाव दाखल केलं. थामा चित्रपटासमोर एक दीवाने की दीवानियत टिकणार नाही असं वाटलं होतं, मात्र हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा पहिल्यांदाच एकत्र आले आहेत आणि या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवलाय.

ज्या चित्रपटानेकोणतेही प्रमोशन किंवा रिलीजपूर्वी कोणताही विशेष प्रचार केला नाही तरी हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट कसा ठरला? हा चित्रपट अवघ्या एका आठवड्यातच एक यशस्वी चित्रपट कसा बनला याची कारणे जाणून घेऊ.

चित्रपट रिव्ह्यू आणि सकारात्मक प्रतिक्रिया: समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा एक चांगला चित्रपट असल्याची टीप्पणी सिने समीक्षकांनी केली. याशिवाय, प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली.

View this post on Instagram

A post shared by Sonam Bajwa (@sonambajwa)

चित्रपटाचा बजेट:

अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' आणि 'जॉली एलएलबी ३' सारखे चित्रपट १०० कोटींचा व्यवसाय करूनही हिट होऊ शकले नाहीत. त्याला कारण ठरले चित्रपटांचे बजेट. दुसरीकडे 'लोका चॅप्टर १' आणि 'सो फ्रॉम सो' सारखे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. कारण त्यांच्या कमी बजेटमुळे त्यांनी जे काही कमावले ते त्यांच्यासाठी अधिकची कमाई होती. हीच गोष्ट या चित्रपटाला लागू होते.

'एक दीवाने की दीवानियत' या चित्रपटाचा बजेट फक्त ₹२५ कोटी आहे. तर या चित्रपटाने आतापर्यंत भारतात सुमारे ₹४५ कोटी आणि जगभरात ₹५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसाला या चित्रपटाची कमाई दोन आकड्यात झाली नाही तरी हा चित्रपट हिट ठरला.

View this post on Instagram

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

प्रमोशनसाठी निर्मात्यांची रणनीती:

चित्रपटप्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. ना चित्रपटातील कलाकार लोकांसमोर आपल्या चित्रपटाबद्दल बोलले. या चित्रपटाचे प्रमोशन निर्मात्यांनी नव्हे तर प्रेक्षकांनी केले. त्याचाच फायदा हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला.

त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या प्रमोशनवर एकही रुपया खर्च करण्यात आला नाहीये. दरम्यान आता अभिनेता हर्षवर्धन राणे स्वतः एका छोट्या व्हॅनमधून देशभर फिरत आहे. प्रेक्षकांना भेटत आहेत. प्रमोशनची ही पद्धत नेहमीच आहे, पण ती सुपरहिट ठरलीय.

View this post on Instagram

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

View this post on Instagram

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

'सनम तेरी कसम' पुन्हा रिलीज झाल्याने हर्षवर्धन एक ब्रँड बनला - हर्षवर्धन राणे यांचा २०१६ मधील मेगा फ्लॉप चित्रपट 'सनम तेरी कसम' पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी चित्रपटाने सुमारे ४२ कोटी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांनी चित्रपटाला खूप पसंती दिली अन् हा चित्रपट सुपरहिट ठरला. अगदी तसाच चित्रपट निर्मात्यांनी सिनेमागृहात आणला आणि प्रेक्षकांनी त्याला हिट केलं

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.