Gondhal Movie: 'आमचा ट्रेलर बघू नका...'; 'गोंधळ' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दिग्दर्शकाचं विचित्र आवाहन, कारण सांगत म्हणाला...
Saam TV October 29, 2025 04:45 AM

Gondhal Movie Director Post : मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘गोंधळ’. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या गजबजलेल्या प्रमोशनच्या काळात ‘गोंधळ’च्या टीमने एक वेगळीच वळणं घेतली आहेत. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांना आवाहन केलं आहे, “आमचा ट्रेलर बघू नका!”

चित्रपटाचा गाभा, त्यातील रहस्य आणि पात्रांचं हळूहळू उलगडत जाणारं प्रवास थेट थिएटरमध्येच अनुभवावा, असं त्यांचं मत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर थोडासा थ्रिल कमी होऊ शकतो, म्हणून संपूर्ण कथा मोठ्या पडद्यावरच पाहावी, असा त्यांचा आग्रह. आजकाल जिथे ट्रेलरचं प्रमोशन हे चित्रपट विक्रीचं सर्वात मोठं साधन समजलं जातं, तिथे ‘गोंधळ’च्या टीमने उलट दिशेने प्रयत्न करत प्रेक्षकांमध्ये आणखी कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

संतोष डावखर म्हणतात, "'गोंधळ'ची कथा, पात्रे आणि कलाकार अतिशय रंजक आहेत; त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा. प्रत्येक पात्र हळूहळू गूढ उलगडत जाते. नाहीतर चित्रपटातील थ्रिल थोडा २-३ टक्के कमी होऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असतील, त्यांनीच ट्रेलर पाहावा. काही गोष्टी या चित्रपटात अशा आहेत ज्या ७० एमएम पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील."

Gangaram Gavankar Passes Away: 'वस्त्रहरण'चे नाटककार काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा
View this post on Instagram

A post shared by Santosh Davakhar (@santosh_davakhar)

या चित्रपटात महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि त्यात दडलेल्या भावना यांची आकर्षक मांडणी पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जातं. डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मिती दीक्षा डावखर यांची आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे अशा अनुभवी व लोकप्रिय कलाकारांची मोठी फौज दिसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.