01012
चित्रकला स्पर्धेमध्ये
नील राज्यात तिसरा
बांदा ः शिवाजी खैरे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सांगेली नवोदय विद्यालयाचा सातवीतील विद्यार्थी नील बांदेकर याने राज्यात तृतीय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपले आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत नीलच्या गटातून राज्यभरातील ६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. नीलने उत्कृष्ट कलाकृती सादर करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या यशामागे त्याचे मामा डॉ. उमेश सावंत यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. नीलने आतापर्यंत ५०० हून अधिक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. त्याच्या यशात त्याचे आई-वडील गौरी बांदेकर आणि नितीन बांदेकर यांचा मोलाचा वाटा आहे.