Solapur Crime: सोलापुरात घरफोड्या करून गेले; पुन्हा चोरीसाठी आले अन् सापडले; सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी
esakal October 31, 2025 04:45 PM

सोलापूर: जुळे सोलापूर हद्दीतील कोणार्क नगर व गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळील घरात २५ ऑक्टोबरला दिवसा चोरी झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळले. शहर गुन्हे शाखेने अथक परिश्रमानंतर संशयितांना हेरले. दरम्यान, चोरी करून तुळजापूरला गेले, तेथे लॉजमध्ये राहिले. पुन्हा सोलापुरात चोरीसाठी आले. त्यावेळी शहर गुन्हे शाखेने चौघांना पकडले. त्यात तिघे यवतमाळ जिल्ह्यातील तर एकजण वर्धा जिल्ह्यातील आहे.

Shevgaon politics: 'शेवगावात युती-आघाडीकडे लक्ष'; लढती महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीतच होण्याची चिन्हे

सोलापूर शहरातील गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळील गौतम गायकवाड हे कुटुंबासह परगावी गेले होते. त्यांच्या घरात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास चोरी झाली होती. त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास कोणार्क नगरातही घरफोडी झाली होती. विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दाखल झाली आणि पोलिस चोरट्यांचा शोध घेऊ लागले. शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वातील पथकास खबऱ्याकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली.

त्यानुसार जुना पूना नाका परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच जुळे सोलापुरात घरफोड्या केल्याची बाब उघड झाली. शेरअली मोती सय्यद (वय २५, रा. इंदिरा नगर मशिदीजवळ, यवतमाळ), प्रसन्न प्रमोद मेश्राम (वय २४, रा. डीएड कॉलेज, भोसा रोड, यवतमाळ), चंदू हिरा भतकल (वय ३९, रा. बोरगाव, वर्धा) आणि रोशन पुरुषोत्तम प्रधान (वय २७, रा. अंबिका नगर, यवतमाळ) अशी त्या संशयितांची नावे आहेत.

त्यांच्याकडून दोन्ही घरफोडीतील एक लाख १९ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

मोठी बातमी! ‘एटीएस’चे पथक सोलापुरात, चौकशीसाठी दोघांना उचलले; एकजण जुबेर हंगरगेकरचा वर्गमित्र, तर दुसरा संपर्कातील शिक्षक; जेलरोड पोलिसांकडूनही चौकशी चौघांवर खून, दरोडा, घरफोडीचे गुन्हे

शहर गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात चौघांना अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधार शेरअली सय्यद याच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलिसांत खुनाचा व मोक्काचा गुन्हा दाखल असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. तसेच अन्य तिघांविरुद्ध पूर्वीचे दरोडा, चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.