 उद्याच्या मोर्चासंबंधी हर्षवर्धन सपकाळांची आज संजय राऊतांसोबत बैठक
            उद्याच्या मोर्चासंबंधी हर्षवर्धन सपकाळांची आज संजय राऊतांसोबत बैठक 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सामना कार्यालयात आज बैठक होणार आहे. ही बैठक उद्याच्या मोर्चाशी संबंधी असून या बैठकीनंतर सपकाळ हे उद्याच्या मोर्चात सामील होणार की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या विकासकामांचे भूमिपूजनराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कुंभमेळा विकास विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्यासाठीच्या विविध विकासकामांना सुरवात होणार आहे.
Bhima Koregaon : कोरेगाव-भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस2018 च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ठाकरेंनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याबाबत दाखल केलेले अर्जावर प्रतिसाद न दिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे.
दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना सक्तमजुरी, शिंदेंच्या शिवसेनेला धक्काभाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले, दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वीच्या (2012) चोंढी इथल्या मारहाणप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आली. तर 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे शिवसेनेला रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे.
Bacchu Kadu : हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराचे बच्चू कडूंवर गंभीर आरोपगोरगरिबांच्या जमिनी कमी दरात लाटून बच्चू कडूंनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर आपला हवामहाल बांधला आहे. या हवामहलाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण तायडे येंनी केली आहे.