डिनर मध्ये बनवा स्वादिष्ट असे Black Sesame Chicken Recipe
Webdunia Marathi October 31, 2025 10:45 PM

साहित्य-

काळे तीळ - ५० ग्रॅम

चिकन - ५०० ग्रॅम

मीठ -एक चमचा

हळद - १/४ चमचा

मोहरीचे तेल - दोन टेबलस्पून

तमालपत्र - एक

लाल मिरच्या - दोन

जिरे -एक चमचा

कांदा - ८० ग्रॅम

आले-लसूण पेस्ट - एक चमचा

हिरव्या मिरच्या

पाणी - ५०० मिली

मीठ - १/४ चमचा (चवीनुसार)

कृती-

सर्वात आधी एका पॅनमध्ये काळे तीळ घाला आणि ते तेल न लावता २-३ मिनिटे कोरडे भाजून घ्या. नंतर गॅसवरून काढा आणि थंड होऊ द्या. एका भांड्यात चिकन ठेवा, त्यात एक चमचा मीठ आणि हळद घाला. चांगले मिसळा आणि ३० मिनिटे मॅरीनेट करा. आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. त्यात तमालपत्र, लाल मिरच्या आणि जिरे घाला. व परतून घ्या. आता कांदा घाला आणि शिजवा. नंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला. व परतून घ्या. मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि ८-१० मिनिटे ढवळत शिजवा. आता भाजलेले काळे तीळ पेस्टमध्ये बारीक करा आणि चिकनमध्ये घाला. चांगले मिसळा. पाणी आणि मीठ घाला. झाकण ठेवून मंद आचेवर ३० मिनिटे शिजवा. चिकन शिजल्यावर नीट ढवळून घ्या आणि गॅस बंद करा. हिरव्या मिरच्यांनी सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.