परुळेबाजारमधील उपक्रमांची सुकळवाड टिमकडून पाहणी
esakal November 03, 2025 12:45 AM

01778

परुळेबाजारमधील उपक्रमांची
सुकळवाड टिमकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ ः मालवण तालुक्यातील सुकळवाड पंचायत समिती मतदारसंघाचे माजी सभापती, उपसभापती व सुकळवाड ग्रामपंचायत सरपंच यांच्या टिमने शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी करत माहिती घेतली. परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी टिमचे स्वागत केले. माजी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती प्रसाद मोरजकर, प्रकाश पावसकर, सुकळवाड उपसरपंच किशोर पेडणेकर, स्वप्नील गावडे, अरुण पाताडे तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत सदस्य सुनाद राऊळ, प्रदीप प्रभू, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी परुळेबाजार ग्रामपंचायतीने राबविलेल्या काथ्या युनिट, प्लास्टिक संकलन युनिट, पाणी प्रकल्प, वॉटर एटीएम यांची टीमने पाहणी केली. या उपक्रमांची विस्तृत माहिती घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.