मोरगाव, ता. २ : मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तरडोली, बाबुर्डी, सुपा क्रमांक एक, सुपा क्रमांक दोन, कारखेल, काऱ्हाटी, जळगाव सुपे या सात गावांमध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्या महिलांना योग्य मार्गदर्शन व औषधोपचार देण्यात आले.
बारामती तालुक्यातील २० गावांमध्ये पुणे जिल्हा परिषद व बारामती पंचायत समिती यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून ॲनिमिया मुक्त गाव अभियान राबविले जात आहे. यासंदर्भात, बारामती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, ‘‘ग्रामीण भागात महिलांमध्ये अंगावर दुखणे काढण्याची प्रवृत्ती जास्त असते. कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून किरकोळ दुखणे दुर्लक्षित राहून मोठ्या विकारांमध्ये रूपांतर होते व महिलांचे आरोग्य धोक्यात येते.’’