भारतावर संकट, रघुराम राजन यांची मोठी चेतावणी, अमेरिकेचा प्रस्ताव भारताच्या मुळावर घाव…
GH News November 03, 2025 09:11 PM

अमेरिकेने लावलेला टॅरिफ भारतासाठी संकट नसून त्यापेक्षाही मोठे संकट भारताच्या पुढे उभे असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले.  H-1B व्हिसा वादापासून ते अमेरिकेच्या प्रस्तावित HIRE कायद्यापर्यंतच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. हेच नाही तर भारताला सावधगिरी बाळगण्याची मोठी गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. हायर कायद्याला H-1B व्हिसापेक्षाही धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफपेक्षा कितीतरी पट हायर कायदा धोकादायक आहे. यूएस हायर कायद्याचा भारताच्या सेवा निर्यात आणि जागतिक प्रतिभेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो, असे रघुराम राजन यांनी म्हटले.

पुढे भारताला इशारा देत रघुराम राजन यांनी म्हटले की, या कायद्यामुळे भारताच्या सेवा क्षेत्रावर मोठा कर लावला जाऊ शकतो. धक्कादायक म्हणजे याचा परिणाम भारतावर अनेक वर्ष दिसू शकतो. अमेरिकेच्या प्रस्तावित एचआयआरई कायद्याचा भारतावर सर्वाधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. H-1B व्हिसाच्या नियमातील बदलामुळे भारतीयांना थोडा फटका बसला. मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट या कायद्याचा फटका असेल.

सेवांवरील शुल्काच्या संभाव्यतेबाबत आहे, जो सर्वात मोठा आणि वास्तविक धोका आहे.  HIRE कायद्यावर अमेरिकन काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. भारताची चिंता वस्तूंवरील शुल्काबाबत नाही तर या कायद्याबाबत आहे. हा कायदा जर लागू झाला तर याचा मोठा फटका भारताला बसेल फक्त फटकाच नाही तर याचा परिणाम अनेक सेवांवर थेट होईल. भारताच्यासमोर असलेल्या मोठ्या संकटाबद्दल बोलताना रघुराम राजन दिसले आहेत.

रघुराम राजन यांनी एकप्रकारे भारताला मोठी चेतावणीच दिल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका भारताबद्दल धक्कादायक निर्णय घेताना दिसतंय. अगोदर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने म्हटले. मात्र, आता भारताबद्दल काहीतरी वाईट अमेरिकेच्या मनात सुरू असल्याचे बघायला मिळतंय. काही वर्षांमध्ये भारताने जी काही प्रगती केली, त्याचा धसका अमेरिकेने घेतल्याचे दिसतंय. काहीही करून त्यांना भारताची प्रगती रोखायची असल्याचाही आरोप आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.