कब्बडीतील भरीव कामगिरीबद्दल सेरेनाचे कौतुक
प्रभादेवी, ता. २ ः बहरीन येथे झालेल्या तिसऱ्या आशिआई युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत कबड्डी खेळात भारताची सुवर्णकन्या सेरेना म्हस्कर हिने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. याबद्दल तिचे कौतुक करण्यात आले.
सातत्याने सराव जिंकण्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दमदार खेळ करीत महाराष्ट्रातील खेळाडू आणि भांडुपची सुकन्या सेरेना म्हसकर हिने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल परिसरातून तसेच सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.