बीड : जिल्ह्यातील निसर्गसंपन्न बालाघाट डोंगररांगा सर्रास गौण खनिज उपसून पोखरल्या जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने तक्रारी करुनही प्रशासन कुठलीच ठोस कारवाई करण्याबाबत पावले उचलत नसल्याचे चित्र आहे.
मांजरसुंबा भागात अनेक ठिकाणी गौण खनिज उपशामुळे मोठमोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. डोंगरांमध्ये मोठमोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत.
याशिवाय डोंगरमाथ्यावरील वृक्षाचीही कत्तल होत आहे. अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतुकीकडे महसूल व पोलिसांकडून काणाडोळा केला जात आहे. यामुळे भूजल पातळीही झपाट्याने घटली आहे.
Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणारविशेष म्हणजे याबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनही सादर केलेले आहे. एकीकडे महसूलचे पथक रस्त्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांची वाहने जप्त करण्याच्या व थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करत असताना दुसरीकडे अवैध गौण खनिज उपशाबाबत मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.